आणि सारेच परिचित चेहरे झालेत निर्जीव
वितळत चाललेल्या मेणबत्यान्प्रमाणे
पण ते चेहरे कधी सजीव होते का?
की सारेच भिन्तीवरील मुखचटे होते?
अमावस्येच्या काळजातील हालाहल पहाण्याची ईर्शा धरली
कारण तेथे कधी दाटी नसते,वारकर्यान्च्या दिन्ड्या तेथे कधी जात नाहीत
पण सुर्यप्रकाशाच्या सुतकाडाप्रमाणे वाटणारे
दुबळे,सोपे चान्द्णेच भोवती पसरले.
भुकम्पातील विक्राळ उन्माद शोधताना
चामदीसारख्या कातड्यावरील अर्थहीन सुरकुत्याच समोर दिसल्या
त्यान्चे देखिल काही सामुद्रीक असते का?
अवताराचा शोध घेत माती तुडवत पाउले झिजवली
आणि अन्गावर बुजगावणी कोसळुन मातीने
मला तुड्वुन मातीत ढ्कलले
मायाविश्वातील खरया मारिचाला पहाण्याचा प्रयत्न केला
तर भाबड्या कान्चनम्रुगान्चा कळप समोरुन गेला
लियरच्या डोळ्यातील अखेरची जाग पहाताना
दिसल्या त्या केवळ डोळ्यान्च्या खोल निश्प्राण खाचा
आश्वथाम्याचे एकतरी जळजळीत वाक्य ऎकावे
म्हणुन आतड्यात कट्यार रुतवुन पायपीट केली
तर भेट्ले मात्र दाढीवाले रेशमी राजयोगी
सतीच्या शिळेतील जास्वन्दी दाह विझुन गेला
व शिळा भन्गुन योनीचा मुक्त सार्वजनिक पिम्पळकटटा झाला
वेचलेल्या प्रत्येक मोत्याला छिद्र होते
आणि शेवटी हति काय लागले हे पहाताना द्यान झाले...
हातात काही पडायला आपल्याला हातच नाहीत....
-जी.ए.
No comments:
Post a Comment