पाठीवर बाहुलीच्या
चांदणीचा शर
गोऱ्या मुलीसाठी
आला काळा घोडेस्वार
प्राक्तनाच्या घळी मध्ये
पावसाचे पाणी
अंधारात घोड्याला
ओळखले कोणी ?
पुरुषाच्या पुढे आली
हिला चढे माज
चार बाया मिळूनिया
काढा हिची लाज
रानझारा ओळखीचा
तहानेची बोली
कात टाकलेला साप
पाचोळ्याच्या खाली
पिंपळाच्या पारावर
ब्रह्मचारी रडे
अंगठीत बसविले
मांत्रिकाने खडे
जोडव्याच्या जोडालाही
डोह घाली धाक
कुंकवाच्या करंड्यात
बाभळीची राख
पाठीमागे उभा
त्याचे दिसेल का रूप
आरश्याच्या शापानेही
आलिंगन पाप
फुफुसाला वारा देती
कळलाव्या ग्रंथी
घोड्याच्याही डोळ्यावर
काळोखाची बुंथी
न्हाहुनिया केस ओले
दारामध्ये आली
खुंटीवर टांगलेली
चोळी चोरी गेली
पलीकडे नदी नादे
अलीकडे पूल
हिरकणी खांबाखाली
गाडलेले मुल
बाभळीच्या विजेपाशी
सावरीची शेज
बोंबाबोंब झाली तेव्हा
डोळा आली नीज
आभासाने येतो वारा
माझ्या मागे मागे
कस्तुरीच्या हरिणाला
जशी आग लागे
दू:ख दिले त्याने
तोच दान मागणार
गोऱ्या मुलीसाठी आला
काळा घोडेस्वार
वाटेवर त्याच्या नाही
मेणुलीचा दिवा
जशी दिशा तसा जातो
कोणत्याही गावा
- ग्रेस
आयुष्याच्या कोणत्याही घटना, माणसं, विचार हे रिलेटीवली जरी अनुभवायचा यत्न केला तर हे सर्वकाही दु:खाच्या महामार्गावर प्रवास करीत आहे असे निदर्शनात येते. काळा घोडेस्वार या कवितेचा सारांश म्हणजे आयुष्य हे दु:खाचे माध्यम आहे. ते विलग करता येत नाही, मग त्याचा स्विकार करणे ओघानेच येते.
आता हे सर्व योजण्यासाठी ही कविता एका जुन्या काळातील नवविवाहित स्त्रीच्या नजरेतुन पाहिली तर बरेच संदर्भ लक्षात येतील. चांदणिचा शर ही उपमा मला सोनेरी पिंजर्यासारखी वाटते. सामान्यतः आपल्यासाठी सफेद घोड्यावर एखादा गोरा,सुंदर राजकुमार यावा ही मुलीची इच्छा असते, परंतु येथे आलेला घोडेस्वार काळा आहे. प्राक्तनाची घळ ही ज्याची त्याची असते, त्यामुळे ती किती आणि कशी भरावी (किती आणि काय प्राप्त व्हावे) यावर अगदी संपुर्ण हक्क नसला तरी त्यात काय असावे याची निवड आपण करण्याचा यत्न करतोच. पण इथे या नवविवाहितेच्या प्राक्तनात आपसूक पडणार्या पावसाचे पाणी आहे, ते तिला 'पदरी पडले आणि पवित्र झाले' या न्यायाने जवळ करावे लागतेय. निवडीचे स्वातंत्र्य नाही आणि मुळात घोडेस्वार ही काळाच म्हणून, 'अंधारात घोड्यालाही ओळखिले कोणी?'
पुढची कड्व्यांत एकमेकांच्या विरोधाभासी प्रतिमा आहेत, आणि या घटनांच्या विरोधाभासाच्या प्रत्येक टोकाला वेगवेगळ्या स्वरुपात दु:खच आहे. जसे कुंकवाच्या करंड्यात असलेली बाभळीची राख, लग्न व्हावं म्हणून अंगठीत खडे बसवणारा ब्रम्हचारी, हिरकणी खांबाखाली गाडलेले मूल....'
पाठीमागे उभा त्याचे दिसेल का रूप' ही वासनेची पहिली मागणी नाहीये का? पण लगेच, 'आरश्याच्या शापानेही आलिंगन पाप' या ओळी येतात. मला याचा संदर्भ लावताना हा एकप्रकारचा व्यभिचाराचा प्रयत्न वाटतो. पाठीमागे असलेला हा 'काळा घोडेस्वार' नाही. हा दुसरा पुरुष असावा. हा व्यभिचार केवळ अपरिमित दु:खातुन सुटका करुन घेण्यासाठी केलेला एक तोकडा प्रयत्न असावा. कोणाशी व्यभिचार ते महत्वाचे नाही, केवळ व्यभिचारासाठी व्यभिचार. पुढची काही कडवी मग अशी येतात,
फुफुसाला वारा देती
कळलाव्या ग्रंथी
घोड्याच्याही डोळ्यावर
काळोखाची बुंथी
न्हाहुनिया केस ओले
दारामध्ये आली
खुंटीवर टांगलेली
चोळी चोरी गेली
यानंतर येणारी शेवटची चारही कडवी ही केवळ आपल्या जगण्यात ठासून भरलेल्या दु:खाचा स्विकार केल्यासारखी वाटतात.
बाभळीच्या विजेपाशी
सावरीची शेज
बोंबाबोंब झाली तेव्हा
डोळा आली नीज
बाभळीची विज, सावरीची शेज....व्यभिचारातुनही दु:खच हाती आलंय...मग आता फरक पडणेही बंद झालंय..विलाप, अकांताची बोंबाबोंब झाली तरी आहे त्याचा स्विकार केला गेला आणि शांत झोप लागलीये. 'दु:ख दिले त्याने तोच दान मागणार' या ओळीला खुप मोठा अर्थ आहे. दु:ख आणि सुख हे नेहमी एकत्र प्रवास करतात. एखादी गोष्ट प्राप्त झाली की जितकं सुख मिळतं तितकंच हीच गोष्ट आपल्या हातुन पुन्हा निघुन जाईल या अपेक्षेचं दु:ख आपल्या मनात घर करून असतं. तसेच, एखादी गोष्ट हरवल्यावर जितकं दु:ख होतं, तितकंच ही गोष्ट परत सापडल्यावर होणार्या आनंदाच्या अपेक्षेचं सुख मनात घर करुन असतं. पण एकदा या चक्रात अडकल्याची 'संपुर्ण' जाणीव झाली की ते भेदता येणं शक्य आहे. शुद्ध दु:खाचा स्वीकार करण्याची भावना या ओळीतुन येते.(everything decays, even our minds)
मग पुढची ओळही आपसूक येते,
वाटेवर त्याच्या नाही
मेणुलीचा दिवा
जशी दिशा तसा जातो
कोणत्याही गावा .....येथे मेणुलीचा दिवा ही कोणत्याही प्रकारची आशा अपेक्षा आहे. हा मेणुलीच्या दिव्याचा पिवळा मिणमिणता प्रकाशच आपल्याला आपण काळ्या दु:खाच्या राजमार्गावर आहोत याची जाणीव करुन देत असतो. जर प्रकाशच माहीत नसेल तर काळोखाची तमा बाळगलीच जाणार नाही. मग कोणत्याही प्रकारची अपेक्षा आणि ती पुर्ण करण्याचे ध्येयच उरले नसल्याने 'जशी दिशा तसा जातो कोणत्याही गावा' हाच मुक्तीचा मार्ग आहे.

No comments:
Post a Comment