Monday 7 November 2011

न्याय

येमेल्यान पुगाचेव नावाच्या रशियन बंडखोराने झारिना केथेरिन दुसरी हिच्या काळात त्याच्या शूर सैनिकांच्या साथीने बंड केले होते. या बंडाचा क्रुरपणे बीमोड केला गेला व पुगाचेवला फासावर चढवले. त्या वेळच्या शेतकरयांमध्ये एक गाणे अतिशय लोकप्रिय होते.(अलेक्झांडर पुश्किनने या बंडाचा इतिहास 'THE HISTORY OF PUGACHOV' या ग्रंथात लिहिला आहे. तसेच या बंडातील काही प्रमुख घटनांचा उल्लेख त्याने आपल्या 'THE CAPTAIN'S DAUGHTER' या कादंबरीमध्ये केला आहे.)

अंधारकोठडीत डांबलेला बंडखोर शेतकरी म्हणतो-

उद्या पहाटे माझा न्याय होणार....
त्या भयंकर न्यायाधीशाआधी झार,
प्रत्यक्ष झार सम्राट मला विचारणार.
सांग, शेतकरयाच्या मुला, खरेखुरे सांग,
कोण होते तुझ्या संगे करित लुटमार?
किती गडी तुझ्या टोळीत, थोडे की बेसुमार?
मी सांगतो राजाधिराज, न्यायी झार,
खरेखुरे सांगतो, सांगुन टाकतो पार
फक्त चार माझे साथीदार
एक रात्र अंधारी काळीशार
दुसरी माझ्या तलवारीची धार
तिसरा माझा घोडा प्यारा
आणि चौथा तंग तीर कामठा
दूतांसारखे तीर धारदार.
मग पुन्हा बोलेल न्यायी झार,
शाब्बास, तू भुमीपुत्र शूर
तुला चांगले ठाऊक, कसे लुटायचे
अन कसे द्यायचे उत्तर
मी खूष बेटा, घे तुला बक्षीस :
खुल्या खुल्या मैदानात उंचच उंच घर
एक आडवी फळी दोन दणकट खांबांवर....
(शेवटच्या ओळीचा अर्थ म्हणजे फाशीचे तख्त हे सांगायला नकोच.)

Thursday 27 October 2011

तेवढ्या दर्शनाने




हात उंचावुन माझी फुले स्वागतास जातील
त्याक्षणी मी असेन की नसेन कोणास ठाऊक?
जेव्हा तारे आप्त म्हणुन माझ्या घरी येतील
उभा दारी असेन नसेन कोणास ठाऊक?

येणारया नवरचनेस माझाही सलाम सांगा
ह्याच भव्य क्षणासाठी उभी हयात जाळली
काहीजण लोहघण हाती धरुन उठलो
बंडाव्याची कोटी बीजे याच भूमीत पेरली

ऋतुंनो ,वारयांनो, फुलांनो, नाजुक परयांनो
जेव्हा या देशात याल कदाचित मी नसेन
आताच तुमच्या हालचाली शब्दांत येतात
तेवढ्या दर्शनानेच मी पुलकित पावेन.
                                              - नारायण सुर्वे

Thursday 25 August 2011

आठवण....



या व्याकुळ संध्यासमयी
शब्दांचा जीव वितळतो .
डोळ्यात कुणाच्या क्षितिजे ..
मी अपुले हात उजळतो .

तू आठवणीतून माझ्या
कधी रंगीत वाट पसरशी,
अंधार व्रताची समई
कधी असते माझ्यापाशी ...

पदराला बांधून स्वप्ने
तू एकट संध्यासमयी
तुकयाचा हातांमधला
मी अभंग उचलून घेई ...

तू मला कुशीला घ्यावे
अंधार हळू ढवळावा ..
सन्यस्त सुखाचा कांठी
वळीवाचा पाउस यावा !
                           -ग्रेस

!! चर्च !!



धुक्यात हरवलेल्या सन्ध्याकाळी
चर्चच्या घन्टा वाजतात
हळुच भविष्याची कवाडे उलगडतात
खिन्नतेची बासरी वाजवत....

मनाची हुरहुर शिगेला पोहचते
पवित्र घन्टानादात हरवते,
धुक्यात हरवलेले, चर्चही स्तब्ध,
जीवघेणी शान्तता, विचारही नि:शब्द....

स्व:ताचा जीवघेणा शोध घेत,
धुके काळीज चिरुन शिरते
आत, आत, पुर्ण अन्तरन्गात,
अनामिक अस्वस्थता मेल्या मनात....

धुके क्रुसाला घट्ट आवळते
उपाशी विधवेच्या आवेगाने.
तरीही चर्चच्या घन्टा निनादतात !
शरीर कोसळुन पडते, उन्मादी पश्चातापाने
                                                              -ग्रेस

पाऊस

पाऊस.
देवळाजवळचा;
पाराजवळचा
पाऊस.
देवळापलीकडचा;
पारापलीकडचा.
पाऊस.
सर्व.
............................................
..............................................
............................................
पाऊस.
रस्तोरस्ती.
रस्त्याच्या पलिकडचा
पाऊस.
रस्त्यात
सर्व काळोखात.
वस्त्यांत.........................
.........................................
........................................
..............................................
आयुष्यात.
गल्लीबोळात.
जुनेरात.
आठवणींच्या
पाताळात
समईत........................
....................................
.......................................
.......................................
......................................
पाऊस.
डोळ्यांत सर्व.
                  -ग्रेस

Childhood

The school's long stream of time and tediousness
winds slowly on, through torpor, through dismay.
O loneliness, O time that creeps away...
Then out at last: the streets ring loud and gay,
and in the big white squares the fountains play,
and in the parks the world seems measureless. -
And to pass through it all in children's dress,
with others, but quite otherwise than they: -
O wondrous time, O time that fleets away,
O loneliness!

And out into it all to gaze and gaze:
men, women, women, men in blacks and greys,
and children, brightly dressed, but differently;
and here a house, and there a dog, maybe,
and fear and trust changing in subtle ways: -
O grief uncaused, O dream, O dark amaze.
O still-unsounded sea!

And then with bat and ball and hoop to playing
in parks where the bright colours softly fade,
brushing against the grown-ups without staying
when ball or hoop their alien walks invade;
but when the twilight comes, with little, swaying
footsteps going home with unrejected aid: -
O thoughts that fade into the darkness, straying
alone, afraid!

And hours on end by the grey pond-side kneeling
with little sailing-boat and elbows bare;
forgetting it, because one like it's stealing
below the ripples, but with sails more fair;
and, having still to spare, to share some feeling
with the small sinking face caught sight of there: 
Childhood! Winged likenesses half-guessed at, wheeling,
oh, where, oh, where?  
                                     -Rainer Maria Rilke

माणसे - अरभाट आणि चिल्लर

सारयाच परिचित वाटा अनोळखी झाल्या आहेत
आणि सारेच परिचित चेहरे झालेत निर्जीव
वितळत चाललेल्या मेणबत्यान्प्रमाणे
पण ते चेहरे कधी सजीव होते का?
की सारेच भिन्तीवरील मुखचटे होते?
अमावस्येच्या काळजातील हालाहल पहाण्याची ईर्शा धरली
कारण तेथे कधी दाटी नसते,वारकर्यान्च्या दिन्ड्या तेथे कधी जात नाहीत
पण सुर्यप्रकाशाच्या सुतकाडाप्रमाणे वाटणारे
दुबळे,सोपे चान्द्णेच भोवती पसरले.
भुकम्पातील विक्राळ उन्माद शोधताना
चामदीसारख्या कातड्यावरील अर्थहीन सुरकुत्याच समोर दिसल्या
त्यान्चे देखिल काही सामुद्रीक असते का?
अवताराचा शोध घेत माती तुडवत पाउले झिजवली
आणि अन्गावर बुजगावणी कोसळुन मातीने
मला तुड्वुन मातीत ढ्कलले
मायाविश्वातील खरया मारिचाला पहाण्याचा प्रयत्न केला
तर भाबड्या कान्चनम्रुगान्चा कळप समोरुन गेला
लियरच्या डोळ्यातील अखेरची जाग पहाताना
दिसल्या त्या केवळ डोळ्यान्च्या खोल निश्प्राण खाचा
आश्वथाम्याचे एकतरी जळजळीत वाक्य ऎकावे
म्हणुन आतड्यात कट्यार रुतवुन पायपीट केली
तर भेट्ले मात्र दाढीवाले रेशमी राजयोगी
सतीच्या शिळेतील जास्वन्दी दाह विझुन गेला
व शिळा भन्गुन योनीचा मुक्त सार्वजनिक पिम्पळकटटा झाला
वेचलेल्या प्रत्येक मोत्याला छिद्र होते
आणि शेवटी हति काय लागले हे पहाताना द्यान झाले...
हातात काही पडायला आपल्याला हातच नाहीत....
                                                    -जी.ए.